Home क्राईम Rape: उमेदवारी देण्याच्या अमिषाने बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक

Rape: उमेदवारी देण्याच्या अमिषाने बलात्कार, मनसे पदाधिकाऱ्याला अटक

Rape Case:  उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत मनसे पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिरगावमध्ये घडली.

MNS office-bearer arrested for rape by Amish for nomination

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत मनसे पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिरगावमध्ये घडली आहे. तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून महिलेला धमकावल्याचा आरोपही आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी वृशांक वडके या मनसे पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष ताकदीनिशी उतरणार आहेत. त्यातच इच्छुक उमेदवारांची गर्दीही वाढत आहे. गिरगावातील रहिवासी असलेले वडके हे मनसे विभागप्रमुख आहे. त्याने एका महिलेला निवडणुकीसाठी तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर वडकेची मागणी वाढत असल्याने महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. उमेदवारी देण्याच्या बहाण्याने वडके याने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ५०० आणि ४२० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून  अधिक तपास सुरू आहे.

Web Title: MNS office-bearer arrested for rape by Amish for nomination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here