पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा करून अंत
Breaking News: पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना.
वाळूजमहानगर: पोहण्यास गेलेल्या चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (दि.११) सायंकाळी सात वाजता उघडकीस आली.
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारे बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अबरार जावेद शेख (१२), अफरोज जावेद शेख (१४) व एक १४ वर्षीय अनोळखी असे चार जण गुरुवारी दुपारी गावाजवळील बनकरवाडी पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते.
मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाइल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली. ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी तलावात मुलांचा शोध सुरू केला. दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पी. के. चौधरी, के.टी. सूर्यवंशी, एन.एस. कुमावत, पी.के.हजारे, एस.बी. महाले, वाय. डी. काळे, एस.बी. शेंडगे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाट, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, तहसीलदार सतीश सोनी, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, नगरी विक अंमलदार योगेश शेळके आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला. चारही मुलांचे मृतदेह ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून घाटीत रवाना केले.
Web Title: Four Boys Who Went Swimming Died
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News