Home Accident News रस्त्यावर व्यायाम करणे जीवावर बेतले! युवक ठार, दोघे जखमी

रस्त्यावर व्यायाम करणे जीवावर बेतले! युवक ठार, दोघे जखमी

Breaking News | Ahmednagar: रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला.

Exercising on the Road is a Lifesaver Accident Youth killed, two injured

पाथर्डी : रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या तीन युवकांना मोटारसायकलने धडक दिल्याने अनिकेत महादेव अकोलकर हा जागीच ठार झाला तर फुलारी व चितळे हे दोघे गंभीर जखमी झाली आहेत. त्यांना उपचारासाठी नगरला दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोद केली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना शेवगाव रोडवर हॉटेल निवांत समोर घडली आहे. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास डांगेवाडी शिवरात हॉटेल निवांत समोर रस्त्यावर व्यायाम करणारे अनिकेत अकोलकर, फुलारी व चितळे यांना मोटारसायकलने जोरात धडक दिली. यामध्ये अनिकेत महादेव अकोलकर हा ठार झाला तर चितळे व फुलारी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे फिरायला येणारे युवक तातडीने धावले व जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. पहाटे फिरायला जाणारे व व्यायामासाठी रस्त्यावरच उतरणाऱ्यांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार अमोल आव्हाड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Exercising on the Road is a Lifesaver Accident Youth killed, two injured

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here