Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग! लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

अहमदनगर ब्रेकिंग! लॉजवर पोलिसांचा छापा, वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Breaking News | Ahmednagar: एका लॉजवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा, दोघांविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध (prostitution) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल.

Police raids lodges, exposes prostitution

श्रीरामपूर: शहरातील अनेक लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाल्याने काल एका लॉजवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी दोघांविरुद्ध स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरातील एका लॉजवर १० जानेवारी रोजी छापा टाकला. त्यावेळी धिरज बिंगले (वय ३३), विजय लांडे हे त्यांचे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशाची देवाण-घेवाण करून महिलांना अनैतिक शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडुन त्यांच्याकडुन वैश्याव्यवसाय करुन घेताना सापडले. यावेळी तीन महिलाही त्याठिकाणी आढळून आल्या. पोलिसांनी या सर्वांकडून मोबाईल व गर्भनिरोधक साहित्य असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.

Web Title: Police raids lodges, exposes prostitution

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here