विवाहाचे आमिष दाखवून बलात्कार, पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा
Breaking Crime News: विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल.
पुणे : विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर, पीडित महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी या उपनिरीक्षकाच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच त्याची पत्नी काजल यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित महिलेची उपनिरीक्षक शिंदे याच्याशी ओळख झाली होती. शिंदे याने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला सातारा रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. महिलेचा विश्वास संपादन करूनतिच्याकडून वेळोवेळी महागड्या भेटवस्तू घेतल्या.
महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर शिंदेने तिच्याशी असलेले संबंध तोडले. या संदर्भात महिलेने जाब विचारल्यानंतर शिंदेच्या पत्नीने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर संबंधित गुन्हा तपासासाठी स्वारगेट पोलीस ठाण्यात सोपविण्यात आला.
Web Title: Rape on the lure of marriage, crime against police sub-inspector
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News