मुल्ला कटरविरोधात अत्याचाराचा चौथा गुन्हा, मुली येतायत समोर
Ahmednagar | Shrirampur: पीडितेची फिर्याद : अत्याचाराचा गुन्हा दाखल, अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन इच्छेविरुद्ध शरीरसंबंध (abused).
श्रीरामपूर: अल्पवयीन मुलीचे धर्मातर करून तिच्याशी बळजबरीने विवाह करणाऱ्या आरोपी मुल्ला कटर विरोधात आणखी एक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका पीडित अपंग मुलीने समोर येऊन कटर याच्यासह चार आरोपींनी अत्याचार केल्याची फिर्याद नोंदविली आहे.
मुलीच्या फिर्यादीवरून मुल्ला कटर, पप्पू गोरे, गुफरान पठाण व आशू पठाण यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कटर याच्याविरोधातील हा चौथा गुन्हा आहे. कटरला अटक झाल्यानंतर पीडित मुली पोलिसांसमोर आल्या आहेत. अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन इच्छेविरुद्ध शरीरसंबंध केल्याचे आहेत.
पीडितेने म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनात कट याच्या अत्याचाराचे तसेच धर्मांतराचे प्रकरण गाजले होते. त्याव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत याच प्रकरणात आरोपीला मदत केल्याच्या आरोपांमुळे पोलीस हवालदार पंकज गोसावी तसेच पोलीस निरीक्षक संजय सानप हे निलंबित झाले आहेत.
Web Title: fourth case of abused against Mullah Cutter,