Home अहमदनगर Accident: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा अपघात

Accident: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा अपघात

Rahuri Accident: अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणाचा  अपघात, अहमदनगर येथे उपचार सुरू.

Accident of a young man who came for firefighter recruitment

राहुरी : अग्निवीर भरतीसाठी विद्यापीठात दाखल झालेल्या तरुणाचा मंगळवारी (दि. ३०) मध्यरात्री अपघात झाला. देहरे येथील शेतकरी कुटुंबातील या विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत.

अभिषेक भारत काळे (१८, रा. देहरे, ता. नगर) असे या युवकाचे नाव आहे. बारावी उत्तीर्ण झालेला हा युवक अग्निवीर भरतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या मोहिमेत सहभागी झाला होता. काल मध्यरात्री १२ नंतरच्या काही शारीरिक चाचण्या त्याने दिल्या होत्या. त्यानंतर तो बाहेर पडला. नगर मनमाड राज्य मार्गावर – तो आला असताना अज्ञात वाहनाने भारत यास धडक दिली.

त्यात तो गंभीर जखमी झाला त्यास तातडीने नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: Accident of a young man who came for firefighter recruitment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here