Home क्राईम संगमनेर: किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; परस्पर विरोधी गुन्हा दाखल-Crime

संगमनेर: किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; परस्पर विरोधी गुन्हा दाखल-Crime

Sangamner Crime: शहरातील माधव टॉकीज जवळ हि घटना घडली. तर हल्ला करणारा विकास व त्याच्या आईला मारहाण.

Crime Knife attack on two over minor dispute; File a conflicting case

संगमनेर: गणेश मंडळाचे पदाधिकारी मंडप लावत असताना एकाने दारूच्या नशेत त्यांना शिवीगाळ केली. दोघे समजावत असताना त्यांच्यावर अचानक चाकू हल्ला करत जखमी केले. सोमवारी रात्री ८.३० वाजता शहरातील माधव टॉकीज जवळ हि घटना घडली. तर हल्ला करणारा विकास व त्याच्या आईला मारहाण केली. परस्पर विरोधी तक्रारी वरून शहर पोलिसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल केला.

विकास बाबुराव येवले हा दारू पिऊन गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करत सुटला. अंकुश मधुकर नालकर व मधुकर नालकर (वाडेकर गल्ली) यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, येवले याने अचानक करण्यात आला आहे.

खिशातून चाकू काढत दोघा बाप लेकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. तर येवलेची आई विजया यांनी सर्वांना शिवीगाळ केली. अंकुश नालकर यांच्या फिर्यादी वरून शहर पोलिसांनी विकास व विजया येवले (पुनर्वसन कॉलनी, माधव टॉकीज जवळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच दरम्यान रात्री १०.३० वाजता सोनू गोविंद नालकर याने व त्याच्या तिघा जोडीदारांनी मला व माझा मुलगा विकास येवले आम्हाला मारहाण केल्याची फिर्याद विजया येवले यांनी पोलिसात दिल्या वरून सोनू नालकर ( वाडेकर गल्ली), प्रवीण बाळू लाड, सुनील बाळू लाड, ऋषिकेश रवींद्र वाघमारे (पुनर्वसन कॉलनी, माधव टॉकीज जवळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime Knife attack on two over minor dispute; File a conflicting case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here