Home संगमनेर संगमनेरमधून १ लाखाचे दागिने व दोन दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या

संगमनेरमधून १ लाखाचे दागिने व दोन दुचाकी चोरट्यांनी लांबवल्या

Sangamner Theft:  दोन घर फोडून ४७ हजाराचे दागिने , महिलेच्या पर्स मधील ६२ हजाराचे दागिने, तर दोन दुचाकी लांबविल्याच्या घटना.

Theft stole jewelery worth 1 lakh and two two-wheelers from Sangamner

संगमनेर:  संगमनेर शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून दोन घर फोडून ४७ हजाराचे दागिने, बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्स मधील ६२ हजाराचे दागिने, तर दोन दुचाकी लांबविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने पोलिसांपुढे आव्हान उभे राहिले.

 संगमनेर पंचायत समिती मधील बाळेश्वर व निझर्नेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या भाग्यश्री नरहरी शेळके व वंदना विक्रम नवले यांचा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ४७ हजाराचे दागिने चोरून नेत सेवानिवृत्त अभियंता मधुकर रामचंद्र देवकर यांच्या घरातील सामानाची उचकापाचक केली. गायत्री सागर पारखे (वय २८, कुरणपूर, ता. श्रीरामपूर) ही महिला संगमनेर बसस्थानकात पारनेर – नाशिक बसमधून खाली उतरताना तिच्या पर्समधील ६२ हजाराचे दागिने चोरट्याने लांबवले.

मच्छिंद्र तायागा शिंदे (वय ३६, संगमनेर खुर्द) यांची घरासमोर उभी होंडा मोटारसायकल (एमएच १७ सीएल ७८०८) तर प्रसाद सुरेश सोनवणे (वय १९, शिवाजीनगर) यांची ऍक्टिव्हा (एमएच १४ सिटी ३०३८) दुचाकी मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेली. सुमारे दोन लाखांचा ऐवज नेला. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: Theft stole jewelery worth 1 lakh and two two-wheelers from Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here