Home अहमदनगर अहमदनगर: वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Suicide News:  वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या.

Student commits suicide by hanging herself in the hostel

अहमदनगर:  नगर शहरातील नागापूर उपनगरात काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्रीती मिलिंद इंगळे वय २० रा. मुंबई असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.  बुधवारी ही घटना उघडकीस आली.

प्रीती इंगळे ही दोन वर्षांपासून काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने मंगळवारी रात्री वसतिगृहामधील तिच्या खोलीमध्ये गळफास घेतला. बुधवारी सकाळी नऊ वाजता तिच्या शेजारी राहणार्‍या विद्यार्थिनींच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वसतिगृहाचे पर्यवेक्षक निलेश रामा केदारे यांना ही माहिती दिली.

त्यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.  वैद्यकीय अधिकारी डॉ. खटके यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Student commits suicide by hanging herself in the hostel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here