Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयात गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन

राजूर: सर्वोदय विद्यालयात गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन

Rajur News: लाडक्या गणरायाचे गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर,राजूर विद्यालयात भक्तिमय वातावरणात आगमन.

Ganpati arrival at Sarvodaya Vidyalaya in a devotional राजूर: ज्या उत्सवाची केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ओढ असते तो उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या उत्सवांनिमित्त लाडक्या गणरायाचे गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर, राजूर विद्यालयात भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार, मोरया रे बाप्पा मोरया … मंगलमुर्ती मोरया, बाप्पांचा स्वागत सोहळा त्यात टाळ, मृदुंग,ढोल ताशांचा नाद गुलाल फुलांची उधळण अशा भक्तिपूर्ण वातावरणामध्ये आज बाप्पांचे आगमन झाले आहे. बाप्पांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याचे दिसून आले. या उत्साहात विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. आरती गणपती स्तोत्र, मंत्र असे मंगलदायी व भक्तिपूर्ण वातावरणात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच या कार्यक्रमात श्री. बारवकर एस.आर. घिगे बी.एस. व पुंजीराम पवार यांच्या अभंग भजनांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्था, संचालक श्री. विजय पवार, विद्यालयाचे प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. उप प्राचार्य श्री. ताजणे बी.एन. पर्यवेक्षक श्री. मोखरे मधुकर आदी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री. साबळे आर.डी. श्री. जोरवर विकास यांनी केले होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: Ganpati arrival at Sarvodaya Vidyalaya in a devotional 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here