Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात  मालवाहू ट्रक पलटी

Accident: संगमनेर तालुक्यात  मालवाहू ट्रक पलटी

Freight truck overturned in Sangamner Accident

संगमनेर  | Accident:  संगमनेर तालुक्यात नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावर आंबीखालसा फाटा (Sangamner) येथे दुभाजकाजवळ मालवाहू ट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी (ता.2) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकमधील कुटी यंत्राचे साहित्य महामार्गावर अस्ताव्यस्त झाले होते. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर सतत वाहनांचे अपघात होत असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग मदत केंद्राच्या पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, , मालवाहू ट्रक (क्र.पीबी.10, ईएच.9179) हा पंजाब येथून कुटी यंत्रांचे साहित्य घेवून कोल्हापूर येथे घेऊन जात असताना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा ट्रक पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा येथे आला असता गतिरोधकावर आदळून दुभाजकाजवळ पलटी झाला.

या घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग व घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली.  मालवाहू ट्रक दुभाजकाजवळ पलटी झाल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत चालू होती.  या अपघातात मालवाहू ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Freight truck overturned in Sangamner Accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here