Home अहमदनगर अहमदनगर मधील सीना नदीचे दृश्य पहाल तर काय म्हणाल

अहमदनगर मधील सीना नदीचे दृश्य पहाल तर काय म्हणाल

What would you say if you saw the view of the river Ahmednagar 

अहमदनगर | Ahmednagar: बुधवारी रात्री जिल्ह्यात पाउस झाला. यामुळे नद्या नाल्यांना पाणी वाहू लागले होते. मात्र नगर जवळ सीना नदीतील पाण्यावर प्रदूषणामुळे फेस जमा झाल्याचे आढळून आले. अहमदनगर शहर आणि एमआयडी सी भागातील प्रदूषित पाणी सीना नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे वाकोडी वाळकी रस्त्य्वरील पदमपुरवाडी पुलाजवळ असा बर्फ सदृश्य प्रदूषित पाण्याचा फेसाचा डोंगर गुरुवारी सकाळी आढळून आला. या फेसाची उंची तब्बल २० फुटापेक्षाही जास्त होती.

नगर शहरातुन वाहणार्‍या सीना नदीत प्रदूषित पाणी सोडले जात असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात फेस निर्माण झाला आहे. वाकोडी ते वाळकी या रस्त्यावरील सीनेच्या पुलावर हा फेस साचला असल्याचे चित्र गुरूवारी सकाळी दिसून आले. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ टाकून सीना नदीच्या प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: What would you say if you saw the view of the river Ahmednagar 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here