तळेगाव दिघे येथील पुलानजीक सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला घुसून अपघात
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीकच्या अपघाती पुलादरम्यान पुन्हा एक भला मोठा सिमेंट वाहतूक करणारा टँकर समोरून आलेल्या वाहनाने हूल देऊन रस्त्याच्या कडेला घुसून अपघातग्रस्त झाला.
लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शुक्रवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे, बाजारतळानजीक असलेल्या अरुंद पूल व वळण रस्त्यावर अपघाताचे मालिका सुरूच असून धोकादायक ठिकाणी कधीही अपघात घडू शकतो त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुणे येथील कंपनीचा सिमेंट वाहतूक करणारा टँकर क्रमांक एम, एच. १२ टीडब्ल्यू ८७३८ घेऊन चालक आकाश अरुण चव्हाण हा लोणीच्या दिशेने जात होता दरम्यान रात्रीच्या सुमारास सदर सिमेंट वाहतूक करणारा टँकर चिंचोली गुरव फाटा रस्त्यावर दिशादर्शक सिमेंट बांधकामास धडकून थेट बाजारतळनजीक पुलाच्या रस्त्याच्या कडेला घुसून अपघात घडला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नाशिक येथून सोलपुर येथे हा टँकर आपण घेऊन चाललो होतो असे चालक आकाश अरुण चव्हाण यांनी सांगितले. याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: Accident tanker carrying cement crashed into the side of the road