Home क्राईम फूस लावून घरी बोलावलं, बॉयफ्रेंडसह मित्रांचा अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

फूस लावून घरी बोलावलं, बॉयफ्रेंडसह मित्रांचा अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Crime News : अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना घडली.

The gang rape of a minor girl by boyfriend and friends

ठाणे: एका अल्पवयीन मुलीसोबत सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची घटना समोर आली  आहे. पीडीत मुलीच्या बॉयफ्रेंडने त्याच्या मित्रासोबत मिळून हे धक्कादायक कृत्य केले आहे. ठाण्यातील मुरबाडमध्ये ही घटना घडली आहे.  या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली  आहे. या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी अद्याप पसार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडीत अल्पवयीन मुलीचे एका तरूणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात असताना आरोपी बॉयफ्रेंडने तिला लग्नाचे आमीष दिले होते. हे आमीष दाखवून आरोपीने बॉयफ्रेंडने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. या संबंधा दरम्यान बॉयफ्रेंडने तिचे अश्लील फोटो काढले होते आणि व्हिडिओ देखील बनवले होते.

पीडीतेचे हे फोटो आणि व्हिडिओ दाखवून आरोपी बॉयफ्रेंडने तिला ब्लॅकमेल करायला सूरूवात केली होती. या दरम्यान आरोपीने बॉयफ्रेंडने पीडितेला त्याच्या मित्रांसोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. मात्र पीडीत मुलीने यास विरोध केला होता. या विरोधानंतर आरोपीने मुलीला फुस लावायला सुरूवात केली आणि फोटो आणि व्हिडिओ फुटेज डिलीट करण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलावून घेतले होते.

आरोपी बॉयफ्रेंडने टाकलेल्या या जाळ्यात मुलगी फसली आणि घरी पोहोचताच तिला धक्काच बसला. कारण आरोपी बॉयफ्रेंडचे दोन मित्र त्याच्या घरी आधीच उपस्थित होते. त्यानंतर आरोपीसह त्यांच्या दोन मित्रांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या बलात्काराच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.

बलात्काराच्या या घटनेनंतर पीडीत मुलगी कशीबशी आपल्या घरी पोहोचली आणि तिने कुंटुंबाला या संपूर्ण घटनेची माहिती दिली.कुटुंबाला हा घटनाक्रम ऐकूण धक्काच बसला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी तिच्यासह वाघीवली पोलीस ठाण्यात दाखल होऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी नराधमांचा शोध सुरू केला होता. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेने ठाण्यात खळबळ माजली आहे.

Web Title: The gang rape of a minor girl by boyfriend and friends

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here