Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक अडवीत ट्रक चालकांना फासले काळे

अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक अडवीत ट्रक चालकांना फासले काळे

Breaking News | Ahmednagar: आंदोलकांनी ट्रक अडवीत चालकांना काळे फसल्याची घटना.

truck drivers were blacked out when the truck stopped

अहमदनगर: हिट ॲण्ड रल कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी वाहन चालक संघटनेचे आंदोलन सुरू असून, आंदोलनकांनी गुरुवारी कोठला येथे ट्रक अडवित चालकांना काळे फासण्यात आले आहे.  दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

हिट ॲण्ड रन कायदा रद्द करावा, या मागणीसाठी अहमदनगर वाहन चालक संघटनेच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. असे असताना नगर शहरातून गुरुवारी ट्रक जात असल्याचे संघटनेच्या लक्षात आले. वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या.

तसेच आंदोलन सुरू असताना ट्रक घेऊन जाणाऱ्या चालकांचा चांगलाच समाचार घेतला. काहींना खाली उतरवून घेत चपलांचा हार घालून काळे फसवण्यात आले. त्यामुळे चौकात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मधूकर साळवे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

Web Title: truck drivers were blacked out when the truck stopped

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here