Home अकोले अकोले: अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कोते

अकोले: अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कोते

Breaking News | Akole:  अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कोते यांची झालेली निवड वैध.

Suresh Kote as Chairman of Abhinav Shikshan Sanstha

अकोले:  येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कोते यांची झालेली निवड वैध ठरवत त्यांच्या कार्यकारीणीचा बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने मंजूर केला आहे. मंगळवारी हा निकाल देण्यात आला.

अकोले शहरात नावाजलेल्या अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी अकोले येथील अगस्ती देवस्थानचे विश्वस्त व कोतुळ येथील कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते यांची तर सेक्रेटरी पदी भाऊसाहेब नाईकवाडी यांची अधिकृतरित्या निवड झाली धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांनी आज यावर शिक्कामोर्तब केले

एकेकाळी संस्थेला टाळे लावण्याची स्थिती निर्माण झाली असताना दानशूर व्यक्तीमत्व सुरेशराव मारुती कोते यांनी संस्थेची जबाबदारी स्वीकारत संस्थेत काम सुरू केले त्यानंतर काही कालावधीतच मधुकरराव नवले आणि सुरेशराव कोते यांनी अभिनव शिक्षण संस्थेचे मोठे जाळे अकोले तालुक्यात निर्माण केले इंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबरच एमबीए बीसीए सारखे अभ्यासक्रम सुरू केले परंतु काही काळानंतर मधुकरराव नवले आणि सुरेशराव कोते यांच्यात अध्यक्षपदावरून तेढ निर्माण झाला 31 मार्च 2022 रोजी अभिनव शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेशराव कोते यांची तर सेक्रेटरी पदी भाऊसाहेब नाईकवाडी यांची संस्थेच्या कार्यकारणीत निवड करण्यात आली मात्र या निवडीला मधुकरराव नवले गटाने ही निवड अवैध असल्याची हरकत घेत धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांचे कडे दाद मागितली होती यावर धर्मदाय आयुक्त अहमदनगर यांच्या न्यायालयात आज मंगळवारी अंतिम सुनावणी झाली असता अध्यक्षपदी सुरेश मारुती कोते यांची तर सेक्रेटरी पदी भाऊसाहेब नाईकवाडी यांची झालेली निवड वैद्य असल्याचे न्यायालयाने शिक्कामोर्तब केले.

सुरेशराव कोते यांच्या गटाने धर्मदाय आयुक्त न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडल्याने त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे तर मोठा राजकीय वरदहस्त लाभलेले अभिनव चे संस्थापक मधुकरराव नवले यांच्या गटाला या निकालाने जबरदस्त धक्का बसला आहे.

सुरेशराव कोते यांच्या गटाने न्यायालयातून आपली बाजू भक्कम मांडल्याने त्यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले यामुळे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे तर मोठा राजकीय वरदहस्त लाभलेले अभिनव चे संस्थापक मधुकरराव नवले यांच्या गटाला या निकालाने जबरदस्त धक्का बसला आहे

नवले आणि कोते यांच्या या निकालाने मात्र अकोले तालुक्यातील शैक्षणिक , सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

गत दोन-तीन वर्षांपासून संस्थेत मतभेद निर्माण झाले आहेत. कोते यांची कार्यकारिणी वैध ठरविण्याचा निकाल आल्यानंतर मधुकर नवले यांच्या गटाने अभिनव शिक्षण संकुलात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका विषद केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको म्हणून संघर्ष टाळण्याचे स्पष्ट करत सहायक धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णयाचा आदर करत वरिष्ठ धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Suresh Kote as Chairman of Abhinav Shikshan Sanstha

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here