Home क्राईम संगमनेरात आणखी एक सोने तारण घोटाळा: महसूलमंत्र्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बँकेत घोटाळा

संगमनेरात आणखी एक सोने तारण घोटाळा: महसूलमंत्र्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या बँकेत घोटाळा

Sangamner Crime News: सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर.

gold mortgage scam in Sangamner Scam in a bank under the revenue minister

संगमनेर: प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा उघडकीस आला आहे. सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील 38 लाख 44 हजार 422 रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे:

1) भानुदास यशवंत ढगे रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले (1 लाख पंचावन्न हजार रुपये) व (1 लाख 90 हजार रुपये)

2) गोरक्ष राधाकृष्ण गाडेकर रा. मनोली, ता. संगमनेर (2 लाख रुपये)

3) सुधीर रावसाहेब घुगे रा. घुलेवाडी, ता. संगमनेर (1 लाख 44 हजार) व (1 लाख 90 हजार)

4) मारुती अण्णासाहेब मंडलिक रा. रायतेवाडी फाटा, संगमनेर खुर्द (दोन लाख रुपये) 5) शरद मारुती पर्बत रा. ढोलेवाडी राजापूर, ता. संगमनेर (1 लाख 91 हजार), (1 लाख 84 हजार), (1 लाख 82 हजार रुपये), (2 लाख रुपये), (1 लाख 80 हजार रुपये) व (1 लाख 92 हजार रुपये)

6) राहुल ज्ञानेश्वर गुरुकुले रा. पाटील मळा, संगमनेर खुर्द (दोन लाख रुपये) व (दोन लाख रुपये)

7) सारिका सतीश पोटे रा. संगम निर्माण संस्था, घुलेवाडी, ता. संगमनेर (4 लाख रुपये)

(8) सुशील सुरेश रोहम रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर (दोन लाख रुपये)

9) सुवर्ण मूल्यांकनकार जगदीश लक्ष्मण शहाणे

याबाबत बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोने तारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.

बँकेने सोन्याच्या मूल्यांकनाचे काम करण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांची नेमणूक केली होती. त्यामुळे बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोने खोटे निघाले तर त्याबाबत मूल्यांकनकार व सोनेतारण कर्जदार यांना जबाबदार धरण्यात येते..

संगमनेरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा संगमनेर, जीएस महानगर को-ऑपरेटिव बँक शाखा संगमनेर या बँकांमध्ये झालेले सोनेतारण प्रकरणे खोटी निघाली असून या बँकांमध्ये जगदीश शहाणे हा अधिकृत सराफ असल्याने त्याच्या व कर्जदारांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेने 40 सोनेतारण कर्जदारांच्या दागिन्यांची तपासणी करण्याचे ठरविले होते. तपासणीअंती आठ सोनेतारण कर्जदारांनी बँकेकडे गहाण ठेवलेले सोने खोटे असल्याचे आढळून आले.

त्यामुळे शाखा अधिकारी सुदाम शेजवळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांनी फेब्रुवारी 2022 पासून कर्ज घेतेवेळी तारण म्हणून बँकेत खोटे सोने ठेवून तसेच खोटे सोने खरे असल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र शहाणे यांनी सोबतच्या आठ कर्जदार आरोपींसह बँकेला देऊन बँकचा विश्वास संपादन करत 38 लाख 44 हजार 422 रुपयांची फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

Web Title: gold mortgage scam in Sangamner Scam in a bank under the revenue minister

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here