संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
Sangamner Accident: संगमनेर खुर्द येथून जाणाऱ्या जुन्यां नाशिक ते पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर खुर्द येथून जाणाऱ्या जुन्यां नाशिक ते पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना घडली आहे.
रोहिदास रामचंद्र पवार वय ४५ रा. रायते ता. संगमनेर असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रोहिदास पवार हे संगमनेर खुर्द येथील जुन्या नाशिक ते पुणे महामार्गावर पायी जात होते. त्याचदरम्यान संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने समोरून जोराची धडक दिली. त्यामुळे या अपघातात पवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. याप्रकरणी अजय पवार या तरुणाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार शहर पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ए.एम. महाजन हे करीत आहे.
Web Title: Sangamner Accident Pedestrian killed on the spot after being hit by an unknown vehicle
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App