Home औरंगाबाद धक्कादायक! चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली महिला आढळली अर्धनग्न अवस्थेत

धक्कादायक! चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेलेली महिला आढळली अर्धनग्न अवस्थेत

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 32 वर्षीय महिलेच्या हत्येमुळे (Murder)खळबळ उडाली, अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला.

Murder Case woman who had gone to pray in a church was found half-naked

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका 32 वर्षीय महिलेच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

 छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा भागात हा सर्व प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. रविवारी रात्री चिखलठाणा विमानतळाच्या भिंतीजवळ अर्धनग्न आणि हात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी. सी सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. दरम्यान, मृतदेहाची ओळख पटली असून सिडको पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरीकडे, रविवारी ही महिला चर्चमध्ये प्रार्थनेसाठी घरातून निघाली होती. मात्र त्यानंतर ती घरी परतलीच नाही. यानंतर कुटुंबियांनी महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र महिलेचा शोध लागला नाही. रात्री अचानक विमानतळाच्या भिंतीजवळ या महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. महिलेचे हात बांधण्यात आले होते. तसेच महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा देखील होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेत एम.आय.डी. सी सिडको पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच तीन संशियीताना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Murder Case woman who had gone to pray in a church was found half-naked

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here