अल्पवयीन मुलीला पळवून नेत गुंगीचे औषध देत वेश्या व्यवसायासाठी…..
Kolhapur Crime : अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला वेश्या व्यवसायाला (prostitution) प्रवृत्त केल्याबद्दल एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल.
कोल्हापूर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिला वेश्या व्यवसायाला प्रवृत्त केल्याबद्दल एका महिलेसह तिघांविरोधात गडहिंग्लजमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोनू कांबळे असे या महिलेचं नाव आहे. तिच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. पीडिताने दिलेल्या जबाबानंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता सोनूच्या परिचयातील आहे. या गोष्टीचा फायदा घेत सोनू व दोन अनोळखी इसमांनी पीडिताला 9 डिसेंबर रोजी पळवून नेल्यानंतर गुंगीचे औषध देत तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. कोणाला सांगिल्यास वडीलांना व भावाला ठार मारण्याची धमकी सुद्धा सोनूने पीडिताला दिली. या घटनेचा नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पीडिताने बालगृहाच्या समुपदेशक व तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबाच्या आधारे गडहिंग्लज पोलिसांनी सोनूसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Kidnapping a minor girl and forcing her into prostitution
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App