Home क्राईम संगमनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबविले

संगमनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबविले

Sangamner Crime: १५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला (Theft).

gold necklace was theft from the woman's neck at Sangamner bus stand

संगमनेर : संगमनेर बसस्थानकातील चोरीचे सत्र अद्याप सुरूच असल्याचे समोर आले आहे. संगमनेर बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्याने लांबविल्याची घटना घटना गुरुवारी (दि. २७) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वैशाली विजय कांबळे (वय ४१, रा. साकुर, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली कांबळे या पोस्ट कार्यालयात नोकरी करतात. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या. संगमनेर साकुर बसमध्ये बसल्यानंतर गळ्यात सोन्याचे गंठण नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. १५ ग्रॅम वजनाचे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी महिला पोलिस नाईक स्वाती थोरात अधिक तपास करीत आहेत.

Web Title: gold necklace was theft from the woman’s neck at Sangamner bus stand

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here