अहमदनगर: फोटो व्हायरल करण्याची धमकी; मुलीचा विनयभंग
Ahmednagar News: अल्पवयीन मुलीचे फोटो व चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, मुलीचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.
राहुरी | Rahuri: अल्पवयीन मुलीचे फोटो व चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत, मुलीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार शनी शिंगणापूर रोडवरील एका गावात गे सुरू होता. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात दोघा बहीण- भावाविरुद्ध विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीला आलिशा शेख हिने २०२२ मधील रमजान ईदच्या दिवशी आवेज शेख याच्याबरोबर सेल्फी काढायला लावले. त्यानंतर दि. २५ जुलै २०१३ पर्यंत आरोपी आवेज शेख याने पीडित अल्पवयीन मुलीच्या फोटोचा वापर करून इन्स्टाग्राम अकाउंट उघडून त्यावर पीडित मुलगी व आरोपी आवेज शेख हे चॅटिंग करत असल्याचे भासवून आरोपी आवेज याने सदर फोटो व्हायरल करण्याची धमकी
दिली. तसेच त्या मुलीचा विनयभंग केला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी आलिशा निसार शेख व आवेज निसार शेख (दोघे रा. उंबरे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर त्या गावात तणाव निर्माण झाला होता. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून त्या गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र लोखंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत.
Web Title: threatening to make the photo viral Molested of a Girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App