Home अकोला बापरे! पोलिस चौकीतच त्याने केले सपासप वार

बापरे! पोलिस चौकीतच त्याने केले सपासप वार

Akola Crime: तक्रार देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर आरोपीने भरदिवसा चक्क पोलिसांसमोर कुऱ्हाडीने हल्ला चढविल्याची घटना.

Crime Filed He stabbed himself in the police station

अकोला: शेतीच्या धुऱ्यावर बांबू रोवल्यावरून वाद झाल्याने तक्रार देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीवर आरोपीने भरदिवसा चक्क पोलिसांसमोर कुऱ्हाडीने हल्ला चढविल्याची घटना महान पोलिस चौकीत गुरुवारी (दि. २७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.

सारकिन्ही येथील रहिवासी कैलास दिपला चव्हाण (वय ४५) व तेथीलच रहिवासी उमेश कोल्हे (४०) यांचे शेत आजूबाजूला आहे. या दोघांमध्ये शेतीच्या धुऱ्यावर बांबू रोवल्याच्या कारणावरून वाद झाला. एकमेकांच्या तक्रारी देण्याकरिता ते दोघे महान पोलिस चौकीत गेले. यावेळी गावचे सरपंच हजर होते. या वादाचा निपटारा आपसात करण्यासाठी सरपंच पोलिसांसमोर दोघांची समजूत घालत होते; मात्र ते ऐकण्यास तयार नव्हते. दरम्यान, उमेश कोल्हे हा शौचास जाऊन येतो, असे सांगून पोलिस चौकीबाहेर आला. थोड्याच वेळात त्याने कुऱ्हाड घेऊन पोलिस चौकीत प्रवेश करीत कैलास चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात चव्हाण यांच्या हाताचे तीन बोटे तुटली आणि मांडीत कुऱ्हाड घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी आरोपी उमेश कोल्हे यास ताब्यात घेऊन कुऱ्हाड जप्त केली व गंभीर जखमीस प्राथमिक उपचारांकरिता महान प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. पुढील उपचारांकरिता अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले.

Web Title: Crime Filed He stabbed himself in the police station

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here