Home अमरावती Suicide: व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेची आत्महत्या

Suicide: व्याजाच्या तगाद्यापोटी महिलेची आत्महत्या

Amravati Crime: एका महिलेने व्याजाच्या तगाद्यापोटी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना.

Suicide of a woman due to interest

अमरावती : नांदगाव खंडेश्वर येथील एका महिलेने व्याजाच्या तगाद्यापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २३ जुलै रोजी पहाटे ३.३० ते ४ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मयत महिलेचा मुलगा ओम जीवनधर लेकुरवाळे (२२, नांदगाव खंडेश्वर) याच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी २७ जुलै रोजी सायंकाळी एका ५५ वर्षीय महिलेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी महिलेकडून ओमच्या आईने काही रक्कम व्याजाने घेतली होती. त्यांनी ती रक्कम व्याजासह परत देखील केली. मात्र, तरीही पैसे शिल्लक आहेतच, अशी बतावणी त्या महिलेने केली. ती रक्कम परत करण्याचा तगादा तिने लावला. त्यामुळे ओमच्या आईचे मानसिक खच्चीकरण झाले. संपूर्ण रककम परत केल्यानंतरही हिला कुठले आणि कुठून पैसे द्यायचे, असा प्रश्न तिला पडला. आरोपीने तिला त्यासाठी मानसिक त्रास दिला. तो त्रास सहन न झाल्याने ओम लेकुरवाळे याच्या आईने २३ जुलै रोजी आत्महत्या केली. आपल्या आईला मानसिक त्रास देऊन त्या महिलेनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार ओमने दिली. त्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Suicide of a woman due to interest

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here