आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का लसीकरणावरून सवाल
सांगली: राज्याच्या आरोग्यमंत्री यांनी काल सकाळी घोषित केले की, १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण करणार आहोत. नंतर पुन्हा ४ वाजता सांगितले की लसीकरण करता येणार नाही. यामुळे लोक पूर्णतः गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती, ती गांजा ओढून घेतली का? असा बोचरा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडवळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री तसेच राज्य सरकारला केला आहे.
राज्यसरकारने सांगितले होते की १ मे पासून लसीकरण मोहीम राबविण्यात येईल मात्र नंतर पत्रकारांशी बोलताना पुरेशा लसी अभावी लसीकरणाची मोहीम राबविता येणार नाही असे राजेश टोपे यांनी सांगितले. त्यावर पडवळकर यांनी हाच मुद्धा घेऊन प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
Web Title: Gopichand Padalkar criticizes Maharashtra Government on vaccination programme