महसूलमंत्री बाळासाहेब थोरात एक वर्षाचं मानधन सीएम रिलीफ फंडात देणार
अहमदनगर: राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) त्यांचे एक वर्षाचे मानधन सीएम रिलीफ फंडात देणार आहेत. तसेच महाराष्ट्र कॉंग्रेसकडून सीएम रिलीफ फंडात ५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीवर येणारा खर्च पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे सर्व आमदार त्यांचे एक महिन्याचे मानधन सीएम फंडात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर आमच्या अमृत उद्योग समूहातील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सीएम रिलीफ फंडात देणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
थोरातयांनी पत्रकारांशी संवाद साधताना माहिती दिली की, सर्वांचे मोफत लसीकरण झाले पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. त्यामुळे आम्हीही मोफत लसीकरण करणार आहोत. यावर मोठा खर्च आहे. त्यामुळे मी माझे एक वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे, कॉंग्रेसचे सर्व आमदारही एक महिन्याचे मानधन सीएम फंडात देणार आहोत. मुख्यमंत्री सहायता निधी देण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन थोरात यांनी यावेळी केले.
Web Title: Balasaheb Thorat will give one year honorarium to CM Relief Fund