अकोले तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले, वीज कोसळून मोठे नुकसान
अकोले | Akole: शहरासह तालुक्याला बुधवारी सायंकाळी सात वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे, शेतात असलेला कांदाही भिजला.
चैतन्यपूर येथील नारायण भागा गवांदे यांच्या वस्तीलगत शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले व अर्ध्यावर मोडून पडले. तसेच संपूर्ण लाईट फिटिंग जळून गेली व इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. घराच्या भिंतीला तडा गेला आहे.
दिवसभर उन्हाचा तडाखा असल्याने उष्णता उफाळून आली होती. पाउस झाल्याने नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला. अकोलेतील बऱ्याच गावांत हजेरी लावली.
अकोलेत दुध घालण्यासाठी आलेले लोक अडकवून पडले. वादळी वाऱ्यामुळे महावितरणने लाईट बंद केल्याने नागरिकांना बराच वेळ अंधारात घालावा लागला. जवळपास हा पाउस एक तास सुरु होता.
Web Title: Akole taluka was lashed by unseasonal rains