Home अहमदनगर लग्न करून हनिमूनही केला अन तरुणीने पतीसोबत केलं असं काही

लग्न करून हनिमूनही केला अन तरुणीने पतीसोबत केलं असं काही

got married to a young man, had a honeymoon and fraud 

Ahmednagar | लोणी | Loni: मराठवाड्यातून आलेल्या एका तरुणीने बाभळेश्वर येथील तरुणाशी लग्नही केले, हनिमूनही केला आणि विश्वास संपादन करीत 3 लाख 70 हजार रुपये घेऊन पोबाराही (Fraud) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमर एकनाथ जेजुरकर (वय 34) मुळगाव तनपुरे गल्ली, राहुरी हा बाभळेश्वर येथे मामाकडे राहून मोलमजुरीचे काम करीत असे. सध्या लग्नासाठी मुली मिळत नसल्याने गावागावात अनेक अविवाहित तरुण दिसत आहेत. अमरला मात्र बायको मिळाली. अश्विनी (रा. हेळस जि. जालना) ही तरुणी आणि तिची मावस बहीण रूपा यांचा अमरशी संपर्क झाला. अश्विनीशी त्याचा विवाह निश्चित झाला आणि बाभळेश्वर येथे 4 एप्रिल रोजी लग्नही झाले. लग्नानंतर ते कोल्हापूरला हनिमूनला गेले. दोन-चार दिवस त्यांचे मजेत गेले. मात्र 30 एप्रिल रोजी कोल्हापूरच्या बस स्थानकावरून अश्विनी आणि रूपा पसार झाल्या. सोबत जाताना त्यांनी लग्नासाठी केलेले 70 हजार 915 रुपयांचे दागिने आणि 3 लाख रोख रक्कमही नेण्यात आली. अमर घरी आला आणि त्याच्या लक्षात आले की आपल्याला विश्वास संपादन करून गंडा (Fraud) घातला आहे. त्याने लोणी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.  अलीकडे लग्न करून गंडा घालण्याचे प्रकार समाजात वाढत आहे.

Web Title: got married to a young man, had a honeymoon and fraud 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here