Home अहमदनगर Accident: कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

Accident: कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

One killed in car-bike collision Accident 

Ahmednagar | अहमदनगर: कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रंगनाथ मनाजी बोरूडे (वय 62 रा. खोसपुरी ता. नगर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील जेऊर बायजाबाई (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयत रंगनाथ बोरूडे यांचे नातू सतिष भाऊसाहेब कदम (वय 21 रा. खोसपुरी) यांनी फिर्याद दिली आहे. रंगनाथ बोरूडे हे त्यांच्याकडील दुचाकीने अहमदनगर-औरंगाबाद रोडवरून प्रवास करत असताना भरधाव वेगाने आलेल्या कार चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या रंगनाथ बोरूडे यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक गांगर्डे करीत आहेत.

Web Title: One killed in car-bike collision Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here