Home अकोले ड्राय डे ला दारू विक्री करणाऱ्या अकोलेत तिघांना अटक

ड्राय डे ला दारू विक्री करणाऱ्या अकोलेत तिघांना अटक

Three arrested for selling liquor on dry day in Akole

अकोले | Akole Crime: ड्राय डे ला दारू विक्री करणाऱ्या तिघांना अकोले पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे.

धनेश्वर काशिनाथ पवार रा. आंबेडकरनगर अकोले, विलास शंकर पवार रा. सुभाष रोड ता. अकोले, सतीश विलास पवार रा. सुभाष रोड ता. अकोले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर उषा शेटीबा पवार रा. शाहू नगर, माधुरी गायकवाड रा. कारखाना रोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

महाराष्ट्र दिननिमित्त ड्राय डे असताना अकोले शहर व परिसरात अवैध दारूची विक्री होणार असल्याची माहिती अकोले पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मिथुन घुगे यांना मिळाली होती. मिथुन घुगे यांनी पोलीस पथक तयार करून अकोले शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून देशी दारूचे बॉक्स जप्त करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत ५६ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  

Web Title: Three arrested for selling liquor on dry day in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here