Home बुलढाणा लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध नवरीला समजले, अन घडले असे काही

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे अनैतिक संबंध नवरीला समजले, अन घडले असे काही

day before the wedding, the bride understands Navradeva's immoral relationship

बुलढाणा | Buldhana: लग्न जमलं, साखरपुडा झाला लग्नाची तारीखही ठरली पण ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध (immoral relationship) असल्याचं नवरीला पुराव्यानिशी समजलं. त्यामुळे नवरीने या प्रकरणाचा जाब नवरदेवाला फोनवरून विचारला. असता  चिडलेल्या नवरदेवाने नवरीच्या घरी जाऊन दंगा केला म्हणून होणाऱ्या सासुबाईंनीच जावयाला तुंरुगात दाखल केल्याची घटना घडली आहे.

लग्न सराई आता मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. अशातच काही जण फसवी लग्न देखील करत आहेत. मुलीकडच्यांना खोटी माहिती देत लग्न ठरलवलेली लग्न खरी माहिती समोर आल्याने ती मोडल्याची अनेक उदाहरण समोर येत असतात. अशातच आता एका नवरदेवाचे अनैतिक संबंधच होणाऱ्या नवरीला माहित झाल्याची घटना घडली आहे.

अमोल पारेकर असं या नवरदेवाच नावं आहे. अमोलचं एका मुलीसोबत लग्न ठरलं, साखरपुडा झाला पण ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचं नवरीला पुराव्यानिशी माहिती झाले आणि त्यामुळे नवरीने नवरदेवाला जाब विचारण्यासाठी फोन केला. मात्र नवरीने फोनच का केला याचा राग मनात ठेवत अमोल याने नवरीच्या घरी येऊन राडा केल्यामुळे नवरीच्या आईने दिलेल्या फसवणूकीच्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी  गुन्हा दाखल करत हळद लावलेल्या नवरदेवाला पोलीस स्टेशन मध्ये बोलावून अटक केली आहे.

अमोल पारेकर अस नवरदेवाच नाव आहे. तो मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील आहे. सुरत येथे भारतीय रेल्वेत मोटरमन म्हणून नोकरीला आहे. पोलिसांनी अमोल पारेकर सह 10 जणांवर मलकापूर पोलिसात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सर्वाना न्यायालयासमोर उभं केलं असता नवरदेवासह इतरांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: day before the wedding, the bride understands Navradeva’s immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here