Home औरंगाबाद Raj Thackeray Breaking: राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Raj Thackeray Breaking: राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Filed a case against Raj Thackeray

औरंगाबाद | Aurangabad: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याच्या संदर्भात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सभा घेण्यापूर्वी पोलिसांनी १६ घातल्या होत्या या अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन या सभेत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी संध्याकाळी औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी घातल्या होत्या. त्यानंतरच राज यांच्या सभेला परवानगी दिली होती.

राज यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचे पडसाद मुंबईत उमटू नयेत किंवा राज यांनी दिलेल्या अल्टीमेटममुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून राज ठाकरे यांनाही पोलीस १४९ अंतर्गत नोटीस बजावू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

तसेच सभेचे संयोजक राजू जवळेकर आणि मनसेचे इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कलम ११६, ११७, १५३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारित ३१ जुलै २०१७ अन्वये गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Filed a case against Raj Thackeray

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here