Home संगमनेर गं. भा. भिकूबाई भिमाजी गुंजाळ यांच निधन

गं. भा. भिकूबाई भिमाजी गुंजाळ यांच निधन

Bhikubai Bhimaji Gunjal Sangamner

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावातील गं. भा. भिकूबाई भिमाजी गुंजाळ (वय ८४) यांचे काल रविवारी सायंकाळी ६:०५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गुंजाळवाडी येथील वैकुंठभूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे उप सभापती नवनाथ अरगडे, गुंजाळवाडी गावचे सरपंच वंदनाताई गुंजाळ, उपसरपंच नरेंद्र गुंजाळ तसेच ग्रामस्थ, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अर्जुन भिमाजी गुंजाळ, दिनकर भिमाजी गुंजाळ, भास्कर भिमाजी गुंजाळ यांच्या मातोश्री होत.

Web Title: Gunjalwadi Bhikubai Bhimaji Gunjal Passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here