Home महाराष्ट्र स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी, एक ठार

स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात लक्झरी पलटी, एक ठार

Luxury overturned in a collision with a luxury car across the Swift car divider

शिरूर:  शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे-नगर महामार्गावर बजरंगवाडी येथे स्विफ्ट कार दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूस येऊन लक्झरीला धडकून झालेल्या अपघातात (Accident) लक्झरी पलटी होऊन थेट एका हॉटेलमध्ये घुसल्याची घटना घडली आहे. या अपघातात स्विफ्टकारचा चक्काचूर होत तब्बल पाच वाहनांसह हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. कार चालक विशाल बबन सासवडे या युवकाचा मृत्यू झाला. तर २५ जण जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर येथील पुणे-नगर महामार्गावरून एम एच १४ एच यु २२६५ हि लक्झरी बस पुणे बाजूने अहमदनगरच्या दिशेने चालली होती. अहमदनगर बाजूने आलेली एम एच १२ पि एन ६७२८ हि स्विफ्ट कार अचानकपणे दुभाजक ओलांडून रस्त्याचे विरुद्ध बाजूला येत लक्झरी बसवर आदळली. यावेळी वेगाने आलेली लक्झरी बस अचानकपणे शेजारील रॉयल पॅलेस हॉटेल समोर असलेल्या विजेच्या खांब व हॉटेलच्या फलकाला धडकून पलटी होत थेट हॉटेलमध्ये घुसली. यावेळी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एन एच १२ एल व्ही ५११५, एन एच ०१ डी के १८०६, एन एच १२ सि के ८५६८ या तीन वाहनांना लक्झरी धडकल्याने या वाहनांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Luxury overturned in a collision with a luxury car across the Swift car divider

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here