Home महाराष्ट्र Weather Rain Alert: यंदाच्या मान्सूनबाबत मोठी बातमी: स्कायमेटचा अंदाज

Weather Rain Alert: यंदाच्या मान्सूनबाबत मोठी बातमी: स्कायमेटचा अंदाज

Weather Rain Alert Big news about this year's monsoon Skymet's forecast

Weather Rain Alert | मुंबई: शेतकऱ्यांसाठी एक सुखदायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे स्कायमेट या खासगी हवामान यंदाचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. या वर्षात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतात यंदा सरासरी ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी आपल्याकडे मान्सून ‘सामान्य’ राहण्याची शक्यता आहे. ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात पावसाळा असतो.

यंदा मान्सूनची सुरुवात चांगली जून महिन्यातच जास्तीत जास्त पाऊस अपेक्षित आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असून मान्सून त्यांच्यासाठी चांगला असेल, कारण सुरुवातीच्या महिन्यात पिकांच्या पेरणीसाठी चांगला पाऊस होईल, यामुळे शेतकऱ्यांना चांगली मदत होईल.

दरम्यान, २०२१ मध्ये देशात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगली पिके घेता आली होती. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचाही मोठा फटका शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळाले होते.

Web Title: Weather Rain Alert Big news about this year’s monsoon: Skymet’s forecast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here