Home अकोले बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी अकोलेची टोळी अटकेत

बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी अकोलेची टोळी अटकेत

Akole gang arrested for smuggling leopard skin

आळेफाटा: पुणे-नाशिक महामार्गालगत बिबट्याच्या कातडीची तस्करी (smuggling) करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात आळेफाटा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बिबट्याचे कातडे जप्त करण्यात आले असून रविवारी (१० एप्रिल) ही कारवाई करण्यात आली.

पुणे-नाशिकमहामार्गावरील हॉटेल फाउंटन समोर वन्य प्राण्यांची कातडे विकण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. बडगुजर यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पथकासमवेत या परिसरात सापळा रचला.

हॉटेल समोरील महामार्गालगत मारुती ८०० गाडी नंबर एमएच १५ एएच ७९६३ मध्ये तीन इसम संशयित बसलेले दिसून आले. गाडीजवळ जाऊन खात्री केली असता तिघे मिळालेल्या बातमीनुसार असल्याची खात्री पटली. पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्रित छापा टाकला असता त्यांना पकडून नाव व पत्ता विचारला. साजिद सुलतान मनियार (वय ३२ – रा. देवठाण), शरद मोहन मधे (वय-३२ रा. शेरनखेल), रामनाथ येसू पथवे (वय ४९ रा. शेरनखेल) सर्व ता. अकोले जिल्हा अहमदनगर अशी सांगितली.

गाडीची पाहणी केली असता डिकीत बिबट्याची कातडी मिळून आली. पोलिसांनी मारुती ८०० गाडी व एक बिबट्याची कातडी जप्त केली. तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. आळेफाटा पोलिसांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Akole gang arrested for smuggling leopard skin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here