ऑनलाईन क्लास: वाढदिवसाच्या दिवशी अल्पवयीन मुलीची मित्रासोबत धूम
अहमदनगर | Ahmednagar Crime: ऑनलाईन क्लाससाठी घेतलेल्या मोबाईलचा उपयोग करत एका अल्पवयीन मुलीने एका तरुणासोबत मैत्री केली. त्यांच्यात रोज संभाषण होऊन ते एकमेकांना भेटत होते. मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते दोघे पळून गेले असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी सोमवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्या युवकाविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्या कुटूंबातील अल्पवयीन मुलगी 11 वीमध्ये शिक्षण घेते. तिच्या ऑनलाईन क्लाससाठी तिच्या घरच्यांनी तिला मोबाईल दिला होता. त्या मोबाईचा वापर करून तिने एका युवकासोबत मैत्री केली. ते दोघे एकमेकांना भेटत होते. 9 एप्रिल रोजी त्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे ती तरुणासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री 9 वाजता घरच्यांना सांगून घराबाहेर पडली.
रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या घरच्यांनी तिचा इतरत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. शेवटी तिच्या वडिलांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुलीचा युवक मित्राविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू केला आहे.
Web Title: Dhoom with a friend of a minor girl on her birthday Crime Filed