Home महाराष्ट्र प्रेयसीला झोपेच्या गोळ्या दिल्या अन पुढे घडले असे काही….

प्रेयसीला झोपेच्या गोळ्या दिल्या अन पुढे घडले असे काही….

gave sleeping pills to his girlfriend and murder her 

पुणे | Pune Crime: प्रेयसीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि त्यानंतर डोके भिंतीवर आपटून तिचा खून (Murder) करण्यात आला. घर अस्ताव्यस्त करून दागिने आणि मोबाइल चोरत घरफोडीचा बनाव करणाऱ्या प्रियकरास हडपसर पोलिसांनी जेरबंद केले. आर्थिक वादातून त्याने हे भयानक कृत्य केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

किसन सीताराम जगताप (46, रा. बेलसर, नारळीचा मळा, ता. पुरंदर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने 44 वर्षीय महिलेचा खून (Murder) केला आहे. याबाबत तिच्या मुलीने तक्रार दिली आहे. ही महिला मुलगी आणि जावयासह वैदूवाडीत राहत होती. ती आणि किसन यांच्यात दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

दरम्यान, काही दिवसांपासून ती किसनकडे पैसे मागत होती. त्यातून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर किसनने तिचा खून केला. त्यानंतर घरफोडीचा बनाव करत दागिने, मोबाइल व एटीएम कार्ड घेऊन तो पसार झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी शोध घेत आरोपीस त्यास जेरबंद केले.

Web Title: gave sleeping pills to his girlfriend and murder her 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here