Home संगमनेर संगमनेर पठार भागात खळबळजनक घटना : मुळा नदीपात्रात आढळला १५ वर्षीय मुलीचा...

संगमनेर पठार भागात खळबळजनक घटना : मुळा नदीपात्रात आढळला १५ वर्षीय मुलीचा मृतदेह

Sangamner 15 year old girl's commited Suicide body

संगमनेर | Sangamner: सतत मोबाईल पाहत असल्याच्या कारणावरून १५ वर्षीय मुलीचे वडील रागावल्याने तिने मुळा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे गुरुवारी ( दि. १४ ) सकाळी ही घटना उघडकीस आली आहे.

अक्षदा विकास वाघ (रा.प्रभाकरनगर ,आंबी खालसा , ता. संगमनेर ) असे या युवतीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विकास वाघ हे आंबीखालसा परीसरातील प्रभाकरनगर येथे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. त्यांची मुलगी अक्षदा ही गावातीलच शाळेत नववीच्या वर्गात शिकत होती. अक्षदा ही सतत मोबाईलमध्ये बघत असल्याने बुधवारी रात्री तिचे वडील तिला रागावले. याचाच मनात राग धरत ती रात्री ११ वाजेच्या सुमारास कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली.  परिसरातील नातेवाईकांनी रात्रभर सदर मुलीचा शोध घेतला. मात्र ती कोठेही मिळून आली नाही. गुरुवारी सकाळी ८: ३० वाजेच्या सुमारास  (दि. १४) ग्रामस्थांना तिचा मृतदेह मुळा नदीपात्रात पुलाखाली आढळून आला.

सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. एकनाथ बाळू शिंदे (रा. आंबी खालसा ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र लांघे हे करीत आहेत.

Web Title: Sangamner 15 year old girl’s commited Suicide body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here