Home अकोले Accident: बिग ब्रेकिंग: इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

Accident: बिग ब्रेकिंग: इंदोरीकर महाराजांच्या गाडीला अपघात

Accident to Indorikar Maharaj's car

जालना | Jalana: प्रसिध्द किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे. काल ते जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.

यामध्ये इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला. एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.

Web Title: Accident to Indorikar Maharaj’s car

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here