Home महाराष्ट्र प्रतिष्ठीत किर्तनकाराचा महिला कीर्तनकारसोबतचा पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ

प्रतिष्ठीत किर्तनकाराचा महिला कीर्तनकारसोबतचा पॉर्न व्हिडिओ’ व्हायरल झाल्याने खळबळ

kirtankara porn video with female kirtankar 'goes viral

औरंगाबाद | Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील प्रतिष्ठीत किर्तनकाराचा महिला कीर्तनकारसोबतचा पॉर्न व्हिडिओ’ (Porn Video) व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

एका महिलेसोबत हे किर्तनकार नको त्या अवस्थेत दिसत असून याच्या दोन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या व्हिडिओनंतर इतर वारकरी संप्रदाय संघटनेकडून या किर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

गेली अनेक वर्षे औरंगाबाद आणि जिल्ह्याबाहेर एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा महिलेसोबत ‘शरीरसंबंध’ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ पाहून त्यांना मानणाऱ्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हे महाराज आणि व्हिडिओमध्ये दिसणारी महिला कीर्तनकार आहेत. त्यांचा मोठा भक्त परिवार आहे.

दोघांचे युट्यूबवर मोठे फॉलोअर्सवर सुद्धा आहेत. नेमकं व्हिडिओमध्ये आहे तरी काय? व्हिडिओमध्ये महाराजांसोबत ‘शरीरसंबंध’ ठेवताना दिसणारी महिला सुद्धा त्यांच्याच क्षेत्रात काम करणारी त्यांची सहकारी आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातीलच आहे. विशेष म्हणजे महिलेने नशा केला असावा, असे व्हिडिओत दिसत आहे. या महिलेला स्पष्टपणे बोलता येत नव्हते आणि सतत डोक्याला हात मारुन डोकं दुःखत असल्याचं व्हिडिओतील संभाषणत दिसत आहे. पण यावर अजूनही अधिकृतपणे कुणीही बोलायला समोर आलेलं नाही. व्हिडिओ नेमका कधीचा आहे,  हे पण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

आपली बदनामी होत असल्याचं लक्षात येताच सदरील महिलेने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सदरील महिला वर औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे पुरुष किर्तनकारानंही काही टोकाचं पाऊल उचलू नये यासाठी महाराजांवर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेवून आहेत.

Web Title: kirtankara porn video with female kirtankar ‘goes viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here