Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: पत्नीस डोक्यात कुदळी घालून तर चार वर्षाच्या मुलास फाशी देऊन...

अहमदनगर ब्रेकिंग: पत्नीस डोक्यात कुदळी घालून तर चार वर्षाच्या मुलास फाशी देऊन हत्या

Murder Wife stabbed in the head and four year old boy hanged

Ahmednagar | Shrirampur | श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागात राहणाऱ्या एका जणाने पत्नीची कुदळीचे वार करून हत्या केली. तर चार वर्षाच्या मुलाच्या गळ्यास दोरीने गळफास देवून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर शहरातील गोंधवणी भागातील खबडीत राहणा-या बलराम कुदळे (वय 40 ) या नराधमाने घरगुती वादातून काल सकाळी त्याची पत्नी अक्षता (वय 35) हिच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. तसेच मुलगा शिवतेज (वय 4 वर्ष) याला आंब्याच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास देवुन जिवे ठार मारले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात बलराम कुदळे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल होत आहे. या घटनेने श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली असून समाजातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Murder Wife stabbed in the head and four year old boy hanged

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here