Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चौघांकडून पती-पत्नीला मारहाण

संगमनेर तालुक्यात चौघांकडून पती-पत्नीला मारहाण

Breaking News | Sangamner:  गवत पेटवून लिंबाची दोन झाडे जाळली. याबाबत विचारणा केली असता पती-पत्नीला चौघांनी मारहाण केल्याची घटना.

Husband and wife beaten up by four men in Sangamner taluka

संगमनेर: बांधावरील गवत पेटवून लिंबाची दोन झाडे जाळली. याबाबत विचारणा केली असता पती-पत्नीला चौघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील राजापूर येथे घडली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती  अशी, की मंगल संजय हासे व संजय हासे हे घराजवळील शेतात गेले असता त्यावेळी बांधावरील गवत व दोन लिंबाची झाडे बाळासाहेब प्रकाश हासे, सुनील प्रकाश हासे, तन्मय सुनील हासे व किरण माधव हासे यांना विचारणा केली असता पती-पत्नीला जबर मारहाण केली. तसेच शिवीगाळ व दमदाटी करून तुम्ही आमच्या नादी लागले तर जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली.

याप्रकरणी मंगल हासे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी गुरनं. १२३/२०२४ भादंवि कलम ३२५, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. महाले हे करत आहेत.

Web Title: Husband and wife beaten up by four men in Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here