Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

संगमनेर तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात दोन ठार

Breaking News | Sangamner Accident: संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन झाल्याची घटना 

Two killed in different accidents in Sangamner

संगमनेर: संगमनेर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन झाल्याची घटना घडली आहे.

लोणी -संगमनेर रोडवर वडगावपान शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत वडगाव पान येथील रमेश आव्हाड हे मृत्युमुखी झाले आहेत.

 तर घारगाव पोलीस स्टेशन हद्दीत रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीला गाडीने धडक दिल्यामुळे व्यक्ती ठार झाले आहे रस्त्याचे काम करणारा मजूर नीरज (वय २३, नगला धर्मपूर, उत्तरप्रदेश) हा तरुण दुचाकीच्या धडकेत जागीच ठार झाला. तर या अपघातात दुचाकी (एम.एच. १७ सी.डी. ५३४६) वरील चालक गणेश भुजबळ (आंबीखालसा) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) रात्री ८ वाजता घारगाव शिवारातील आंबी फाटा जवळील लक्ष्मी लॉन्स समोर हा अपघात झाला. नीरज रस्त्याने पायी चालला होता. मात्र, दुचाकीच्या जोराच्या धडकेने तो जागीच ठार झाला. घारगाव पोलिसांनी घटनास्थळी येत नीरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात हलविला. रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Two killed in different accidents in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here