Home अहमदनगर अहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अहमदनगर: मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Breaking News | Ahmednagar: रात्रीच्या वेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल.

minor girl was molested by entering the house in the middle of the night

अहमदनगर: रात्रीच्या वेळी घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन (वय १२) मुलीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

नागेश कैलास कर्पे (रा. काटवन खंडोबा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलीच्या आईला शुक्रवारी (दि. १६) मारहाण केल्याने त्या येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी घरात फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिची लहान बहिण होत्या. रात्री ११:५५ वाजेच्या सुमारास नागेश त्यांच्या घरात आला. तो म्हणाला, ‘तुझी आई सिव्हिल हॉस्पिटल येथे अॅडमिट आहे’, असे म्हणून त्याने फिर्यादीसोबत गैरवर्तन करण्यास सुरूवात केली. नागेशच्या कृत्यामुळे फिर्यादी मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली.

दरम्यान फिर्यादी मुलीने आईला फोन करते असे म्हणताच तो त्याठिकाणाहून निघून गेला. फिर्यादी आईने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि. २०) कोतवाली पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी नागेश कर्पे विरोधात विनयभंग, पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: minor girl was molested by entering the house in the middle of the night

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here