Home अहमदनगर अहमदनगर: चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर: चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Breaking News | Ahmednagar: चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Bike rider killed in collision with four-wheeler Accident

देवळाली प्रवरा: राहुरी फॅक्टरी येथे नगर- मनमाड मार्गावरील वाणी ओढा येथे चारचाकी वाहन व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुहा येथील शंकर साहेबराव खपके असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

 बुधवारी सकाळी ११ वाजता शिर्डीहून नगरच्या दिशेने जात असलेल्या चारचाकीने दुचाकीस पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक शंकर खपके इतकी जोराची होती की, दुचाकीस्वार हा रस्त्याच्या विरुद्ध बाजूने उडून पडला. याचवेळी समोरून येणाऱ्या ऊसतोडणी कामगार घेऊन जात असलेल्या वाहनाखाली तो सापडला गेल्याने जागीच ठार झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. शंकर साहेबराव खपके (वय ५५ वर्षे, रा. गुहा, ता. राहुरी) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान घटनास्थळी परिसरातील तरुण मंडळींनी तातडीने मदतकार्य केले. तर रुग्णवाहिकेच्या मदतीने मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनास्थळी स. पो.उपनि. तुळशिदास गीते यांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Bike rider killed in collision with four-wheeler Accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here