Home अहमदनगर अहमदनगर: पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला १५ कॉपीबहाद्दर पकडले

अहमदनगर: पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला १५ कॉपीबहाद्दर पकडले

Breaking News | Ahmednagar:  इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यात १५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले, कर्जत, जामखेड आणि पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा सहभाग.

Ahmednagar Caught 15 copies of the first English paper

अहमदनगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला काल, बुधवारपासून सुरूवात झाली. सकाळी ११ ते २ यावेळेत झालेल्या इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जिल्ह्यात १५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले. यामध्ये कर्जत, जामखेड आणि पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

केंद्रावर कॉपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी दिले असल्याने कॉपी झालेल्या केंद्राच्या संचालकांवर आता काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ६४ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यात ११० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात  आले आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा बसावा, म्हणून जिल्हास्तरावर ७ भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. याच भरारी पथकाने पहिल्यास दिवशी इंग्रजी पेपरला १५ विद्याथ्यांना कॉपी करताना पकडले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस हे प्रमुख असलेल्या भरारी पथकाने कर्जत तालुक्यातील राशीन येथील हश् अडवाणी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात तपासणी केली असता पाच विद्यार्थी कॉफी करताना मिळून आले. तसेच याच पथकाने जामखेड तालुक्यातील नान्नज येथील नंदादेबी विद्यालयात पाच विद्यार्थी कॉपी करताना पकडले. उपशिक्षणाधिकारी (योजना) संजय सरोदे हे प्रमुख असलेल्या भरारी पथकाने पाथर्डीतील एम. एम. निन्हाळी उच्च माध्यमिक विद्यालयात तीन तर वसंतदादा पाटील विद्यालयात दोन अशा पाच विद्याथ्यांना कॉपी करताना पकडले आहे.

दरम्यान, परीक्षेच्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर कॉपी होणार नाही, याची सर्वच यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, जर केंद्रावर  कॉपी झालेली आढळली तर केंद्र संचालकांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले असल्याने च पहिल्याच पेपरला १५ कॉपी मिळून आल्याने संबंधित केंद्र संचालकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Ahmednagar Caught 15 copies of the first English paper

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here