Home नाशिक नाशिक ब्रेकिंग! इमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला 23 वर्षीय महिलेचा मृतदेह

नाशिक ब्रेकिंग! इमारतीच्या डबक्यामधील गोणीत आढळला 23 वर्षीय महिलेचा मृतदेह

Breaking News | nashik Crime: एका इमारतीच्या तळमजल्यात गोणीमध्ये २३ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह (Dead body).

Nashik Crime missing woman dead body found

नाशिकरोड : नाशिकरोड एकलहरे परिसरात सिडकोच्या युवकाची हत्या झाल्याची घटना घडली होती. ती घटना ताजी असतानाच दुसर्‍यादिवशी उपनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या तळमजल्यात गोणीमध्ये २३ वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह (Dead body) उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सोनाली भानुदास काळे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गालगत एलआयसी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या कारडा कन्स्ट्रक्शनच्या अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये सोनाली काळे यांचा मृतदेह आढळून आला.

मृत सोनाली यांच्या कुटुंबियांनी त्या बेपत्ता झाल्याची तक्रार तीन दिवसांपूर्वी उपनगर पोलिसांत दाखल केली होती. त्यानुसार पोलीस तपास करत होते. सकाळी या इमारतीच्या तळमजल्यावरील एका डबक्याच्या गोणीत सोनाली यांचा मृतदेह आढळून आला.

सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, घटनास्थळी धाव घेतली, गुन्हे शोध पथक व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला.

Web Title: Nashik Crime missing woman dead body found

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here