Home क्राईम धक्कादायक! ‘तू दिसायला चांगली नाहीस’ म्हणत पतीने केली पत्नीची हत्या

धक्कादायक! ‘तू दिसायला चांगली नाहीस’ म्हणत पतीने केली पत्नीची हत्या

Nanded Crime News: तू दिसायाला चांगली नाहीस असं सांगत पत्नीला मारहाण करुन पतीने तिची हत्या केल्याची घटना.

Husband killed his wife saying 'You are not good looking

नांदेड: जिल्ह्यातल्या परोटी तांडा या गावात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तू दिसायाला चांगली नाहीस असं सांगत पत्नीला मारहाण करुन पतीने तिची हत्या केली आहे. तू दिसायला चांगली नाहीस, तुझ्या माहेरी जा आणि पैसे घेऊन ये असंही हा पती त्याच्या पत्नीला म्हणाला होता. ६ मे रोजी त्याने तिला मारहाण केली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. रेश्मा गोकुळ चव्हाण असं विवाहितेचं नाव आहे. गोकुळ नामदेव चव्हाण असं तिच्या पतीचं नाव आहे. गोकुळने रेश्माला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

गोकुळ आणि रेश्मा या दोघांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालं होतं. या दोघांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सगळं काही सुरळीत सुरु होतं. मात्र पती गोकुळ चव्हाण, सासू विमला चव्हाण आणि दीर कृष्णा चव्हाण हे रेश्माला त्रास देऊ लागले. तू माहेरी जा आणि खर्चासाठी पैसे घेऊन ये असा तगादा तिच्या मागे लावू लागले. या कारणावरून पती गोकुळ चव्हाण हा पत्नी रेश्माला बेदम मारहाण करत असे. ६ मे रोजीही अशीच मारहाण रेश्माला करण्यात आली ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला.

रेश्माला जी मारहाण झाली त्यातच तिचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळताच त्यांनी इस्लापूर पोलीस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. रेश्माचा पती, सासू आणि दीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणीही तिच्या नातेवाईकांनी केली. या घटनेनंतर पोलिसांनी रेश्माचा पती गोकुळ, तिची सासू आणि दीर या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband killed his wife saying ‘You are not good looking

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here